अभिनेत्री लारा दत्ताच्या वडिलांचे दुःखद निधन
अभिनेत्री लारा दत्ताच्या वडिलांचे दुःखद निधन
img
नंदिनी मोरे
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता यांच्यावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लारा दत्ता  हिचे वडील एल. के. दत्ता यांचे निधन झाले आहे.एल.के. दत्ता यांचं ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. एल.के. दत्ता हे भारतीय हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर होते. त्यांच्या निधनाने दत्ता कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आज शनिवारी, ३१ मे रोजी लारा दत्ता पती महेश भूपती यांच्यासोबत मुंबईत वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या. 

लारा दत्ता यांच्या वडिलांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, तसंच कुटुंबाकडून कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. लारा दत्ता यांचे वडील भारतीय वायुसेनेत विंग कमांडर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सेवेबद्दल आणि समर्पणाबद्दल लोक त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. 12 मे रोजी लाराने आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. ही तारीख लारासाठी विशेष महत्त्वाची आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, 12 मे ही तारीख तिच्या आयुष्यातील दोन अत्यंत खास क्षणांशी संबंधित आहे – कारण या दिवशी तिला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळाला होता आणि हाच तिच्या वडिलांचा जन्मदिवस सुद्धा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group