आजकाल पैशांसाठी भामटे काय करतील याचा काही नेम नाही. फसवणुकीचे अनेक वेगवगेळे नुस्के या भामट्यांकडून केले जातात. अशा फसवणुकींना अनेक जण बाली पडत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. हल्ली या प्रमाणामध्ये देखील चिंताजनक वाढ झाली आहे. दरम्यान, एक 73 वर्षीय वृद्ध महिला अशाच एक फसवणुकीला बाली पडली आहे.

डोंबिवलीमध्ये एका आजीबाईंसोबत एक अजब प्रकार घडला. एका 62 वर्षांच्या आजोबाने एका 73 वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचं आमिष दाखवलं. उतारवयात साथीदार मिळेल म्हणून आजींना विश्वास टाकला अन् इथंच चूक झाली. आजींकडून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी चुना लावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित 62 वर्षीय वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार करत होत्या, अशातच त्यांना अनुज तिवारी नावाच्या 73 वर्षांच्या वृद्धालाही उतारवयात जोडीदार हवाय, अशी 'समवयस्कर जोडीदार पाहिजे' अशी जाहिरात पाहिली. मग या महिलेनं अनुज तिवारी यांच्याशी संपर्क केला.
मुळात ही जाहिरात अनुज तिवारीनेच दिली होती. आता ही जाहिरात पाहिली आणि वृद्ध महिलेनं तिवारीशी संपर्क केला. दोघांचं आधी फोनवर बोलणं होतं होतं. मग हळुहळु संपर्क वाढत गेला. नियमित दोघे बोलत होते. त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. उतारवयात लव्ह स्टोरी बहरायला आली. तिवारीने हळूहळू वृद्ध महिलेची सर्व माहिती गोळा केली. ही महिला डोंबिवलीमध्ये एकटी राहते. मागे पुढे फारसं कुणी नाही, हे लक्षात आलं.
मग तिवारीने या महिलेचा विश्वास संपादन केला. आपण दोघेही एकत्रित पुण्यात एक घर घेऊन राहू, असं आश्वासन त्या वृद्ध महिलेला दिलं. आपणास चांगला जोडीदार मिळतो असा विचार करून फसवणूक झालेल्या महिलेने अनुजवर विश्वास ठेवला.अनूजने मग पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन राहू लागला. आपण लग्न करून एकत्र राहू असं तो सांगत होता. मग त्याने घर घेण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी सुरू केली.
वृद्ध महिलेकडून ३५-लाख रूपये टप्प्या-टप्प्याने काढून घेतले. धक्कादायक म्हणजे, घर खरेदीच्या बनावट पावत्या त्याने महिलेला दाखवल्या. ही वृद्ध महिला एकटीचं असल्याने या महिलेला लुटण्याचा विचार अनूज तिवारीने पक्का केला होता. त्यानंतर डोंबिवलीतील घरात राहत असताना तिवारीने घरातील कपाटातील २०-तोळ्याचे सोन्याचे दागिने वृद्ध महिलेला न नकळत चोरलं. एवढंच नाहीतर डेबिट कार्ड चोरून बँकेतून ०२-लाख ४० हजार रूपयांची रक्कम सुद्धा काढून घेतली. असा एकूण ५७ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज तिवारीने लुटला. पैसे हातात आल्यानंतर तिवारी गायब झाला अन् वृद्ध महिलेशी बोलणंही बंद केलं.
तिवारीने अचानक वृद्ध महिलेशी बोलणं टाळललं, तो तिचा फोनही घेत नव्हता. तिवारी असा अचानक बोलत का नाही, यामुळे वृद्ध महिलेला संशय आला. तिने घरातील कपाटात पाहणी केली तेव्हा तिला धक्का बसला. कपाटातून सोन्याचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. आता आपली फसवणूक झाली हे वृद्ध महिलेला लक्षात आलं. आयुष्यभरात जमवलेले पैसे एका झटक्या गायब झाल्यामुळे वृद्ध महिलेला मोठा धक्का बसला. तिने लगेच डोंबिवली विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिवारीवर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण अजून हा तिवारी पोलिसांच्या ताब्यात आला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे.