'मातीचे मडके, काळ्या रंगाचे कापड' भोंदूबाबाचा 'हा' कारनामा तुम्हालाही चक्रावून सोडेल
'मातीचे मडके, काळ्या रंगाचे कापड' भोंदूबाबाचा 'हा' कारनामा तुम्हालाही चक्रावून सोडेल
img
दैनिक भ्रमर
सुजाण पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. भोंदू बाबाच्या फसवेगिरीला बळी पडणाऱ्या रोज बातम्या समोर येत असताना पुण्यातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तधन शोधून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तब्बल अडीच लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार इथे समोर आला आहे. 

४२ वर्षीय फिर्यादी या पुण्यातील कोथरूडच्या रहिवाशी आहेत. त्यांची खान बाबा उर्फ मदारी महमद खान यांच्यासोबत एका व्यक्तीमुळे ओळख झाली होती. या भोंदू बाबा ने फिर्यादी यांना तुमच्या घरात गुप्तधन आणि सोन्याचा खजिना आहे आणि ते मी काढून देतो असं अमिष दाखवलं. या अमिषाला बळी पडून फिर्यादी तयार झाल्या.

या भोंदू बाबा ने फिर्यादी यांना गुप्तधन आणि सोन्याचा हंडा शोधण्यासाठी काही विधी आणि हवन करावा लागेल असं सुद्धा सांगितले आणि त्यासाठी काही पैसे लागतील अशी बतावणी केली. फिर्यादी यांनी भोंदू बाबाला वेळोवेळी तो मागत असलेली रक्कम द्यायला सुरुवात केली. फिर्यादी यांनी आरोपीला वेळोवेळी रक्कम देऊन तब्बल 2 लाख 60 हजार रुपये गमावले.

पंधरा दिवसांपूर्वी महिलेच्या घरी पूजा मांडून तिला एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले. हे कापड 17 दिवसांनी उघड तुला सोनं मिळाले, असे सांगितले. मात्र या हांड्यात माती होती. आपल्या घरात कुठलंच गुप्तधन नाही आणि आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. आता पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group