धक्कादायक : दोन बायकांचा एकच नवरा, चोरीमध्ये दोघीपण बाप , भानगड नेमकी काय?
धक्कादायक : दोन बायकांचा एकच नवरा, चोरीमध्ये दोघीपण बाप , भानगड नेमकी काय?
img
Dipali Ghadwaje
राजस्थानच्या झुंझुनूमध्ये पोलिसांनी दोन चोर महिलांना अटक केलीय. त्यांच्या चोरी संदर्भात हैराण करणारा खुलासा झाला आहे. या स्टोरीमध्ये दोन महिलांनी केलेल्या चोरीचा समावेश आहेच. पण नात्याचा सुद्धा अँगल आहे. अटक केलेल्या दोन्ही महिलांच एकाच व्यक्तीशी लग्न झालं आहे. म्हणजे दोघी परस्परांच्या सवत आहेत. या दोघी झुंझुनूमध्ये चोरी करायच्या.

मिळालेल्या माहितीनुसार , दोघी ऑटोमध्ये बसून लोकांचे दागिने आणि बॅग्स लंपास करायच्या. कोतवाली पोलिसांना दोन्ही महिलांकडे चोरी केलेले दागिने मिळाले आहेत. त्याची किंमत एक लाख रुपयापेक्षा जास्त आहे. चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलांची नावं सावित्री (30) आणि राजोदेवी (40) आहेत. दोघांच्या पतीच नाव शेर सिंह बावरिया आहे. दोन्ही महिला अलवर जिल्ह्यातील निमराना माधोसिंहपुरा येथे राहणाऱ्या आहेत.

कशी होती चोरीची पद्धत?

दोन्ही महिला प्रवासी म्हणून रिक्षात बसायच्या. त्यानंतर चोरीच कृत्य करायच्या. एक महिला कव्हर द्यायची आणि दुसरी चोरी करायची. दोघी इतक्या सफाईदारपणे चोरी करायच्या की कोणाला काही समजायचच नाही. पोलिसांना एका चोरीच्या प्रकरणात या दोघींबद्दल समजलं. 11 एप्रिल रोजी मंडावाच्या भारू गावातील एका व्यक्तीने पोलीसात चोरीची तक्रार केली होती.

त्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने पत्नीसोबत झुंझुनूंमधील एका ज्वेलर्सच्या शोरुममधून एक लाख रुपयाचे दागिने विकत घेतले. दागिने विकत घेऊन तो रिक्षाने घरी येत होता. त्यावेळी गांधी चौकाच्या दिशेने जाताना प्रभात टॉकीजजवळ तीन महिला रिक्षात बसल्या. काहीवेळाने तो पत्नीसोबत रिक्षातून उतरला. त्यावेळी त्याच्या बॅगची चैन उघडी होती. त्यातून दागिने गायब होते.

ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास केला. प्रभात टॉकीज ते गांधी चौक पर्यंतच सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या दरम्यान पोलिसांनी संशयित महिलांची ओळख पटवली. अखेर चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत दोघींनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपी महिलांच्या पतीची भूमिका सुद्धा तपासली जात आहे.

पोलिसांना दोन्ही महिलांच्या पतीवर संशय आहे. तो चोरीचे दागिने विकण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी असू शकतो. अजूनपर्यंत या प्रकरणात पती सहभागी असल्याच सिद्ध झालेलं नाही. पण पोलीस तपास सुरु आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group