नाशिक : भांड्यांच्या दुकानातून मूर्ती चोरणार्‍या तीन महिलांना अटक
नाशिक : भांड्यांच्या दुकानातून मूर्ती चोरणार्‍या तीन महिलांना अटक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : येथील भांडी बाजारातील दुकानातून मूर्ती चोरून नेणार्‍या तीन महिलांना गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 20 ऑगस्ट रोजी गिरीश दिनकर शेटे यांच्या भांडी बाजारातील दुकानातून तीन महिलांनी मिळून एक गणपती व चार हत्ती यांच्या मूर्ती चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक शहरात काही महिला गर्दीचा फायदा घेऊन दुकानात शिरून दुकानदाराची नजर चुकवीत चोरी करीत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट-1 च्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले होते.

हे ही वाचा... 
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

मूर्ती चोरीप्रकरणी समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस हवालदार संदीप भांड यांना गोपनीय माहिती मिळाली, की भांडी बाजारात चोरी करणार्‍या महिला मेळा बस स्टॅण्ड येथे येणार आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी मेळा बस स्थानकात सापळा रचला असता सुमनबाई सावळीराम जाधव (वय 55), फुलाबाई शिवाजी गायकवाड (वय 35) व कमलबाई राधाकिसन जाधव (वय 45, सर्व रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले. 

हे ही वाचा... 
संतापजनक ! १५ वर्षीय आईने प्रसूतीनंतर जिवंत अर्भकासोबत केलं असं काही की...

मानवी कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी शेटे यांच्या दुकानातून मूर्ती चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक गणपतीची मूर्ती व पितळाच्या चार हत्तीच्या मूर्ती असा एकूण 15 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group