'त्याने फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्...' ; तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हादरले ; नेमकं काय घडलं?
'त्याने फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्...' ; तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हादरले ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
हेलियम गॅसने स्वत:ला गुदमरवून घेत सीएसने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीमध्ये घडला आहे. नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या एका २५ वर्षीय सीएसचा मृतदेह गेस्ट हाऊसच्या बेडवर पडलेला आढळला.

नवी दिल्लीतील बाराखंबा पोलिसांनी तरुणाचा मृतदेह, हेलियमचा सिलेंडर आणि पाइप लेडी हार्डिंग रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव धीरज कंसल असे आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचा धीरज तोंडात हेलियम गॅस सिलेंडरला जोडलेला पाईप घेऊन झोपला होता. शरीरात हेलियम गॅस गेल्याने गुदमरुन धीरजचा मृत्यू झाला. तो महिपालपूरमधील एका पीजीमध्ये राहत होता. दिल्लीतील एअरबीएनबी गेस्ट हाऊसमध्ये धीरजने आत्महत्या केली.

गेस्टहाऊसमधील त्याचा खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि खोलीतून दुर्गंधी आल्याने पोलिसांना संपर्क करण्यात आला. तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. धीरजच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट आढळली.

सुसाईड नोटमध्ये काय?

'माझ्या मृत्यूने कुणी दुःखी होऊ नका. माझ्यासाठी मृत्यू हा आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहे. आत्महत्या करणे वाईट नाही. माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती आणि मी कोणाशीही फारसा संलग्न नव्हतो, माझा कोणाशीही संबंध नव्हता. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही', असे धीरजने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

धीरजने मास्क घातला होता, जो पातळ निळ्या पाईपद्वारे व्हॉल्व्ह आणि मीटरने हेलियम सिलेंडरला जोडलेला होता. त्याच्या चेहऱ्याभोवती पातळ पारदर्शक प्लास्टिक गुंडाळले होते आणि मानेवर एक सील होता.

धीरजच्या वडिलांचे २००३ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केले होते. त्याला भाई-बहीण नाहीयेत, तो एकुलता एक आहे. तो पीजीमध्ये राहत होता, व्यवसायाने तो सीए आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर त्याचे काका आणि चुलत भाऊ समोर आले होते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group