राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवसे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कल्याणमध्ये एका महिलेचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार < कल्याण डोंबिवलीमध्ये मागील आठवड्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. इतर दोन कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका रुग्णावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका रुग्णालय उपचार देऊन सोडण्यात आलं आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात एक महिला खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांची रिपोर्ट घेण्यात आला होता, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. या महिलेचा रिपोर्ट घेतल्यानंतर त्याच रात्री मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण ४ रुग्ण आहे, त्यापैकी एका महिलेला उपचार देऊन सोडण्यात आलं आहे. महापालिकेकडून आवाहन करण्यात येतं आहे, सगळ्यांनी काळजी घ्यावी, रुखमिनी वार्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मास्कचा वापर करावा, हात नेहमी स्वच्छ ठेवावे. वृद्ध व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, जर कोणतीही कोरोनाची लक्षण वाटली तर लगेच कल्याण डोंबिवलीच्या रुग्णालयात उपचारासाठी यावं, असं आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेकडून करण्यात आलं आहे.