पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. दरम्यान आता वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे.

अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक तपशील आता समोर आला असून त्यात धक्कादयाक खुलासे झाले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मारहाणीमुळे देखील झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात वैष्णवीच्या शरीरावर जखमा असून या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हंटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वैष्णवीचं लग्न अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्याशी झालेला होता. यावेळी लग्नात फोरचूनर गाडी, 51 तोळे सोनं आणि 7.5 किलो वजनाचं चांदीचं ताट वैष्णवीच्या वडिलांनी दिलं होतं. असं असूनही तिचा हुंड्यासाठी छळ झाल्याचं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणण आहे.