लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या नवीन आयुष्याची सुरुवात आणि अतिशय असा आनंदी क्षण, परंतु हाच विवाह सोहळा एका वर आणि वधू साठी अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. कारण एका नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ च मिनिटात हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना कर्नाटकातील बागलकोटमध्ये घडली आहे.

कर्नाटकातील बागलकोटमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने वराचा मृत्यू झाला. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रवीण कुरणे (26) असे या वराचे नाव असून तो कुंभारेहल्ली गावचा रहिवासी होता. त्याने नुकतेच बेलागावी जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील पार्थनहल्ली गावातील एका तरुणीशी लग्न केले होते. वधू त्याच्या मामाची मुलगी होती.
सुरुवातीला सर्वकाही आनंद आणि उत्सवाने भरलेले होते. नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक आणि पाहुणे मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी अचानक प्रवीण थरथर कापू लागला आणि त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो स्टेजवर कोसळला. त्याच्या कुटुंबाने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.