सोलापुरात आज एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात कारखान्यातील ८ कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान , या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्यांसाठी पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींसाठी 50 हजार रुपयांचा निधी केला जाहीर केली आहे. तसेच , या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो, अशी पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत संवेदना केल्या व्यक्त केला आहे. अक्कलकोट एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आहेत आठ जणांचा मृत्यू झाला त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मृत्युमुखी पडलेला मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये मंजूर करण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्यात टॉवेल बनवण्याचं काम करण्यात येत होतं. पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्यानंतर सकाळच्या सत्रात तीन तर दुपारी पाच वाजता पाच जणांचा होरपळून माहिती मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीसेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक देखील कारखान्यात अडकले होते. तर ५ जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. या पाच जणांना कारखान्याच्या बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे.