धक्कादायक !  साडे दहा लाखांचे दागिन्यांची चोरी, चोरट्यांच्या मारहाणीत महिलेचा जागीच  मृत्यू , कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! साडे दहा लाखांचे दागिन्यांची चोरी, चोरट्यांच्या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू , कुठे घडली घटना ?
img
नंदिनी मोरे
राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. चोरी, दरोडे, फसवणूक अशा अनेक घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. काही ठिकाणी चोरी सह हत्ये सारखे मोठे आणि गंभीर गुन्हे देखील घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. मध्यरात्री घरात प्रवेश करून महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी घरातील साडे दहा लाखांचे दागिने लंपास केले. चोरट्यांच्या मारहाणीत महिलेचा जागेवर मृत्यू झाला. पोलिसांनी पाच चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात सुशांत सुरेश गुरव यांच्या घरी १८ तारखेच्या मध्यरात्री अडीच वाजता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश करुन त्यामधील पिवळे रंगाचा शर्ट घातलेले आणि तोंडाला काळपट मास्क घातलेल्या चोरट्याने सुशांत सुरेश गुरव यांना पाठीत जबरदस्त मारहाण केली. तर इतर तीन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीची पत्नी पुजा गुरव यांना डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण केली. चोरट्यांच्या मारहाणीत पुजा यांचा जागीच मृत्यू झाला. मयत पूजा यांच्या शबनम बॅगमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडे दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

चोरट्यांनी फिर्यादीची पत्नी पुजा सुशांत गुरव हिस जीवे ठार मारून पळून गेलेबाबत चार अनोळखी इसमांविरुध्द फिर्यादी जबाब दिल्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा सविस्तर तपास आजरा पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group