डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : आरोपी मनिषा मुसळेबाबत मोठे खुलासे
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : आरोपी मनिषा मुसळेबाबत मोठे खुलासे
img
नंदिनी मोरे
सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केला आहे. दरम्यान,  आता आरोपी मनिषा मुसळेबाबत मोठे खुलासे होत आहेत. 

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी मनीषा मुसळे माने हिला न्यायालयाने पुन्हा एकदा 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा मुसळे माने  हिची पोलीस कोठडी मिळावी म्हणून आज मनीषा माने यांना न्यायालयात आणण्यात आलं होतं.  यावेळी आरोपी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोलापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 
 पोलिसांनी न्यायालयात आरोपी मनीषा माने विरोधात विविध नवीन आरोप केलेत यामध्ये प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार संबंधने आरोप करण्यात आलेत

पोलिसांच्या माहितीनुसार डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 42 साक्षीदार तपासले असून आतापर्यंत झालेल्या तपासात डॉ. वळसंगकर यांच्या एसपी न्युरोसायन्स हॉस्पिटलमध्ये आरोपी मनिषा मुसळे माने हिने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मनिषा मुसळे-माने हिचे बँकेत 3 खाते असून या खात्यातील जवळपास 70 लाख रुपयांचे कोणतेही कर भरले नाही तर पगाराव्यतिरिक्त 39 लाख रुपये खात्यामध्ये कुठून आले याचा पुरावा नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. शिवाय आरोपी मनीषा मुसळे माने हिने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देऊन बँकेत पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

दरम्यान मनिषा मुसळे मानेवर मृत डॉ. शिरीष वळसंगकर किंवा फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांनी कोणत्याही पद्धतीने आर्थिक गैरव्यवहर केल्याचा आरोप केलेला नाही. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पोलिसांनी जुनेच कारण पुढे आणल्याचा आरोपी मनिषा माने हिच्या वकिलांनी कोर्टात दावा केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group