अमरावती जिल्ह्यातून मोठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे काँग्रेसच्या नेत्याचा मुलगा लग्नाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झाला आहे. या घटनेनं अमरावतीत एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी वडील असलेल्या काँग्रेस नेत्याकडून अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता आहे. वैभव मोहोड ( ३० वर्षे) असे तरूणाचं नाव आहे. वैभवचे लग्न अवघ्या काही तासांवर ठेपले असताना म्हणजेच उद्या लग्न असतानाआज बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वैभव शिवाजी महाविद्यालयातलिपिक म्हणून कार्यरत होता. मंगळवारी (१३ मे) सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ झाला तरी वैभव घरी परतला नाही, त्याच्याशी संपर्क देखील झाला नाही. वैभव घरी परत न आल्याने वडिलांनी थेट पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली.