नाशिक - आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले असून या ठिकाणी वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून घरांची पडझड आणि अन्य नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यापासून बेमोसमी पावसाने नाशिक मध्ये धुमाकूळ घातला असून यामध्ये आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील करजुल सु या ठिकाणी मन्सु चव्हाण यांच्या मालकीच्या गोठ्यावर वीज पडून हेल्याचा मृत्यू झाला आहे तर सुरगाणा तालुक्यातील खडकी डिगर या ठिकाणी देविदास सिताराम भोळे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती विद्युत मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. भाऊराव सोमा पीठे यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे तर सोमनाथ हिरामण धुळे यांच्या सुरगाणा येथील घराचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.