अन.. त्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं ! बॉम्ब शोधताना पतीला अपंगत्व, पत्नी जिद्दीने झाली CRPF मध्ये भरती
अन.. त्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं ! बॉम्ब शोधताना पतीला अपंगत्व, पत्नी जिद्दीने झाली CRPF मध्ये भरती
img
दैनिक भ्रमर

ते म्हणतात ना की  एखादी गोष्ट मिळवायची असेल तर माणसाला फक्त जिद्द असावी लागते. ही जिद्द असेल तर असे कोणतेच काम नाही जे पूर्ण होऊ शकत नाही. एका पत्नीने आपल्या पतीची इच्छा पूर्ण कारण्यासानाही अशी काही जिद्द  धरली आणि तिनं  ते स्वप्न पूर्णही केलं. ज्याने भल्याभल्यांना अवाक वाटेल अशी ही  जळगावमधील एका विवाहितेची गोष्ट आहे. 

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेची चक्क CRPF मध्ये निवड झाली आहे. अनिता मनोहर पाटील असे या गृहीणीचे नाव असून त्यांना दोन मुले आहे. त्याचे पती सीआरपीएफमध्ये होते. भुसुरुंग शोधताना पोलिसांच्या गाडीने मागून टक्कर दिल्याने ते जायबंदी होऊन कायमचे अंपग झाले. त्यानंतर त्यांची नोकरी सुटली. त्यामुळे पतीचे देशसेवेचे स्वप्न आता अनिता पाटील पू्र्ण करणार आहेत.

CRPF मध्ये कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आल्याने अनिता यांचे पती मनोहर पाटील यांचे देशसेवेचे स्वप्न अपूर्ण राहिले. पतीचे देशसेवेचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिता पाटील या CRPF मध्ये भरती झाल्या होत्या. आता त्यांना निवडीबाबतचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. लवकरच अनिता पाटील या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

अपघातामुळे देशसेवेचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने पतीच्या मनाला बोचणारी खंत पाहीली जात नव्हती, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तयारी केली आणि सीआरपीएफमध्ये भरती झाल्याचे अनिता पाटील यांनी म्हटले आहे. पती आणि दोन मुलांपासून लांब राहण्याचा खूप मोठा त्रास होणार आहे मात्र देशसेवा आणि पतीचे स्वप्नापुढे तो त्रास फार कमी असल्याचे त्या म्हणाल्या. तर आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी.. पत्नीने उचललेला पाऊल याचा खूप मोठा अभिमान आणि आनंद असल्याची प्रतिक्रिया मनोहर पाटील यांनी दिली आहे.

भावाच्या लग्नात प्रियकराला माहेरी बोलावले,अन् नवऱ्याचा काटा काढला
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील माहेरवाशीण तसेच धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील सासर असलेल्या विवाहितेची चक्क CRPF मध्ये निवड झाली आहे. अनिता मनोहर पाटील असे या विवाहितेचे नाव आहे. त्या चक्क दोन लेकरांची आई असून या वयात सुद्धा त्यांनी जिद्दीने तयारी करत पतीच्या मदतीने सीआरपीएफ मध्ये निवडीचे यश मिळवला आहे. निवडीबाबत त्यांना नियुक्तीपत्र मिळाल असून लवकरच त्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

अनिता पाटील यांचे अकरावीपर्यंत शिक्षण झालं आहे. धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील मनोहर पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीनेच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. बारावी, त्यानंतर शेतकी डिप्लोमा आणि पदवीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. शिवणकाम, पार्लरचेही काम सुरू होते. लग्नानंत सहा महिन्यांनी मनोहर पाटील हे सीआरपीएफमध्ये छत्तीसगड येथे कर्तव्यावर होते. तेथे कर्तव्यावर असताना २२ ऑगस्ट २०१२ रोजी बॉम्ब शोधत असताना मागून आलेल्या छत्तीसगड पोलिसांच्या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघाताने त्यांना अपंगत्व आल्याने त्यांनी डिपार्टमेटने पाच वर्ष अगोदरच स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगितले. या अपंगत्वामुळे पूर्ण सेवा न होताच पतीला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. हे अपंगत्व आले नसते तर आणखी देशसेवा करता आली असती, ही पतीच्या मनाला बोचणारी खंत  त्यांना सहन होत नव्हती त्यामुळे अनिता पाटील यांनी सीआरपीएफमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला.

पती धावण्याचा सराव घेऊ लागले
पती मनोहर पाटील यांनी पत्नीच्या निर्णयाला बळ दिले. यासाठी पत्नी अनिता पाटील हिची त्यांनी स्वतः शारीरिक आणि मैदानी चाचणीची तयारी करून घेतली. ते क्रीडांगणावर जाऊन धावण्याचा सराव घेऊ लागले. रोज पहाटे ४ वाजता उठून दोन्ही मुलींच्या शाळेची तयारी करून ५ वाजता ग्राऊंडला जात होते. तब्बल दोन ते अडीच तास धावण्याचा सराव, व्यायाम, योगासने करीत होते. सायंकाळीही एक ते दीड तास सराव करीत होते. भरतीचा सराव करताना दोन्ही मुलींचे आणि घरातील आवरून करावे लागत होते. सुरवातीला धावण्याचा सराव नसल्याने पायांना सुज येत होती. गुडघे ठणकत होते. मात्र पती प्रोत्साहन देत होते. यामुळेच अनिता पाटील मैदानी आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्या.

मुलींच्या भविष्यासाठी आणि पतीच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नासाठी
अनिता पाटील यांची मोठी मुलगी यामिनी ही दहावीत तर लहान प्रज्ञा ही सातवीत आहे. सीआरपीएफमध्ये प्रशिक्षणासाठी आता जावे लागणार असल्याने दोन्ही मुली आणि पती यांना लांब सोडून जाण्याबाबत त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुलींचे आणि आपल्या पतीचे काय होणार या विचाराने त्या चिंताग्रस्त तसेच बैचेन झाल्या आहेत. मात्र मुलींच्या भविष्यासाठी आणि पतीच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नापुढे आणि देश सेवेपुढे गी त्रास फार कमीच असल्याचं अनिता पाटील सांगतात.


इतर बातम्या
Join Whatsapp Group