धक्कादायक ! भरदिवसा लोखंडी रॉडने वार करत प्रेयसीची निर्घृण हत्या, कुठे घडली घटना
धक्कादायक ! भरदिवसा लोखंडी रॉडने वार करत प्रेयसीची निर्घृण हत्या, कुठे घडली घटना
img
दैनिक भ्रमर
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक गंभीर घटना हल्ली घडत आहेत. दरम्यान, अशीच एक निर्घृण हत्येची घटना उगघडकीस आली आहार.  एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं लोखंडी रॉड लपवून आणत अचानक पार्किंगमध्ये बसलेल्या प्रेयसीवर हल्ला केला. हा हल्ला इतका अमानुष होता की, आरोपीनं अवघ्या २० सेकंदात तब्बल 15 वार केले आहेत. या मर्डरचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 

हेमलता वैद्य असं हत्या झालेल्या ३० वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अक्षय दाते असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी अक्षय आणि हेमलता मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. अक्षय हा सातत्याने हेमलतावर चारित्र्याचा संशय घेत होता. याच संशयातून त्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हेमलता ही विवाहित असून काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं. त्यानंतर ती आपल्या मुलीला घेऊन नागपुरात राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हेमलता आणि आरोपी अक्षय दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी आहेत. हेमलताच्या चारित्र्यावर अक्षय नेहमी संशय घेत होता. त्यावरून दोघांचे भांडण होतं असत. घटनेच्या दिवशी मंगळवारी दोघांत पुन्हा वाद झाला होता. याच वादातून अक्षयने लोखंडी रॉडने हल्ला करत हेमलताचा जीव घेतला आहे. ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा हेमलता आपण राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये खुर्चीवर बसली होती.

यावेळी अचानक अक्षय पायऱ्यांवरून खाली आला. यावेळी त्याने आपल्या शरीराच्या मागे लोखंडी रॉड लपवला होता. हेमलता बसलेल्या ठिकाणी आल्यानंतर त्याने अचानक रॉड बाहेर काढला आणि हेमलतावर वार केला. यावेळी हेमलता जीवाच्या आकांताने ओरडू लागली. पण अक्षय तिच्यावर वार करत राहिला. त्याने अवघ्या २० सेकंदात तब्बल १५ वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीनं घटनास्थळी रॉड टाकला आणि तिथून चालत निघून गेला. हल्ल्याची माहिती समजताच सोसायटीतील लोकांनी हेमलताला मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अक्षयला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group