युद्धजन्य काळात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचे मनमाडला चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर
युद्धजन्य काळात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचे मनमाडला चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर
img
दैनिक भ्रमर

मनमाड : प्रतिनिधीयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास  रेल्वेचे देशातील महत्वाच्या मनमाड येथील रेल्वे कार्यशाळेत नागरी सुरक्षा संघटनवतीने मॉल ड्रिल घेण्यात आले.यावेळी युद्धजन्य काळात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सज्ज असल्याचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला.

  आग लागल्यानंतर नागरिकांची सुटका कशी करायची ? जखमी नागरिकांना प्राथमिक उपचार कसे करायचे,आगीवर नियंत्रण कसे कसे मिळवायचे इमारतीमध्ये अडकलेल्या जखमीची सुटका कशी करायची यासह येणाऱ्या विविध अडचणीवर कसे नियंत्रण मिळवायचे यासह विविध प्रकारचे चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली.दरम्यान नागरिक सुरक्षा संघठन,मनमाड मध्य रेल्वे यांच्या वतीने बुधवार(दि.०७) रोजी युद्धजन्य परिस्थिती संदर्भातील मॉक ड्रिल घेण्यात आले. यामध्ये त्यांनी युद्धात होणाऱ्या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना वाचवण्याची पद्धती आणि त्या व्यक्तींवर प्रथमोपचार कसा पद्धतीने केला जातो या संदर्भातील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

हे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी नागरिक सुरक्षा संघटन विभागातील संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर दखणे,नागरिक सुरक्षा निरीक्षक मनमाड येथील सहयोगी रमेश केदारे,संतोष खरे,सोलोमन सोनवणे,सोमनाथ सनस,शशिकांत आढोकार आदी स्वयंसेवक तसेच येथील रेल्वेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.ही मॉग ड्रिल व्यवस्थित सुरळीत पार पाडली.या ड्रिलसाठी रेल्वेच्या इंजीनियरिंग कारखान्याचे मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे,सहाय्यक कारखाना प्रबंध रामनरेश यादव आणि रेल्वे सुरक्षा बाळाचे निरीक्षक दीपक दुहान आणि त्यांचे कर्मचारी आणि सहाय्यक सामुग्री प्रबंधक उमेशकुमार शर्मा आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group