ग्राहकांसाठी आता खुशखबर आहे. गॅसच्या किंमतीत घसरण झाली अस्लायचू दिलासादायक बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत (19 किलो) घसरण झाली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत (14.2 किलो) कोणताही बदल झाला नाही. गेल्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तात्काळ प्रभावाने वधारल्या होत्या. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ही सातत्याने बदल होत आहे. तर अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमती अटोक्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमत जैसे थे आहेत. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाले आहे.
ताज्या अपडेटनुसार, दिल्लीत आतापर्यंत 19 किलोच्या गॅससाठी ग्राहकांना 1747.50 रुपये द्यावे लागतील. एप्रिल महिन्यात हेच सिलेंडर 1762 रुपयांना मिळत होते. तर मार्च महिन्यात एका गॅस सिलेंडरसाठी 1803 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे गेल्या एका महिन्यात 14.5 रुपये आणि दोन महिन्यात एकूण 55.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे.
दिल्ली : 1,747.50 रुपये (एप्रिल महिन्यात 1,762 रुपये)
कोलकाता : 1,851.50 (1,868.50 रुपये)
मुंबई : 1,699 रुपये ( एप्रिल 1,713.50 रुपये)
चेन्नई : 1,906.50 रुपये ( एप्रिल 1,921.50 रुपये)
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 8 एप्रिल 2025 रोजी मोठा बदल झाला होता. 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरची किंमत गेल्या वर्षभरापासून स्थिर होत्या. पण त्यात आता 50 रुपयांची वाढ दिसून आली.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 8 एप्रिल 2025 रोजी मोठा बदल झाला होता. 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरची किंमत गेल्या वर्षभरापासून स्थिर होत्या. पण त्यात आता 50 रुपयांची वाढ दिसून आली. 1 मे पर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती शहरानुसार अशा आहेत.
दिल्ली : ₹853
कोलकाता : ₹879
मुंबई : ₹852.50
चेन्नई : ₹868.50