जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर भारताने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांनी सुरु होणारी अमरनाथ यात्रा रद्द होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आता या विषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर तिथं जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अनेकांनी जम्मू-काश्मीर टूरचे बुकिंग रद्द करून टाकले आहे. याच भागात आगामी तीन महिन्यांनी अमरनाथ यात्रा चालू होणार आहे. असे असतानाच आता या हल्ल्यानंतर आता यावर्षी अमरनाथ यात्रा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे..
दरम्यान, यावेळची यात्रा रद्द होणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ही यात्रा रद्द होणार नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.