मंत्री नितेश राणेंनी मच्छीमारांसाठी केल्या ''या'' ३ मोठ्या मागण्या !
मंत्री नितेश राणेंनी मच्छीमारांसाठी केल्या ''या'' ३ मोठ्या मागण्या !
img
संपादकीय
राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता  मच्छीमारांसाठी काहीशी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. मस्त्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी  मच्छीमारांसाठी  ३ महत्वाच्या आणि मोठ्या म्हण्या केल्या आहेत. सागरी किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यांची एक समिट पार पडली आहे. महाराष्ट्र सरकार आणि मस्त्य व्यवसाय खात्याने या कार्यक्रमाचे यजमान पद भूषविले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भारत सरकारकडे मस्त्य व्यवसाय मंत्री म्हणून काही मागण्या केल्या आहेत.

 एलईडी फिशिंग संदर्भात जे नियम आहेत, ते आणखीन कडक करण्यात यावेत, महाराष्ट्र किनारपट्टीवरील एलईडी फिशिंग पूर्णपणे बंद करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजावर सीआरझेडची टांगती तलवार असते. त्यांना सातत्याने नोटीस दिली जात असते. याबद्दल केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे प्रत्येक मच्छीमाराचे घर सीआरझेडचे नियम शिथील करून अधिकृत करण्याची योजना आणावी अशी मागणी मस्त्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

तिसरी मागणी म्हणजे अनधिकृत मासेमारी होते, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांचे मंत्री येथे आले होते. या राज्याचे ट्रॉलर येथे येऊन मासेमारी करून जातात. त्यांच्यावर कारवाई करावी. एक कालावधी निश्चित करून मासेमारी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या काही मागणी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्यांकडे पाहिले जाईल असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group