येवल्यात आयशर ट्रक चालकाने ट्रकच्या केबिनमध्येच घेतला गळफास
येवल्यात आयशर ट्रक चालकाने ट्रकच्या केबिनमध्येच घेतला गळफास
img
दैनिक भ्रमर
येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे;  नगर मनमाड महामार्गावर येवल्या जवळील असलेल्या राजस्थान ढाबा परिसरामध्ये विश्रांतीसाठी थांबलेल्या एका परप्रांतीय ट्रक चालकाने आपल्याच ट्रॅकच्या केबिनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट असून चालकाची ओळख पटेल असा कोणताही पुरावा त्याच्या जवळ नसल्याने चर्चांना उधाण आले आहे मयतास खाजगी रुग्णवाहिका द्वारे येवला उपजिल्हा रुग्णालय येथे  शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,  या घटनेचा पुढील तपास  येवला शहर. पोलीस  करत आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group