राज ठाकरेंना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण ? ''त्या''  बॅनर्सवरचा मजकूर काय ?
राज ठाकरेंना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण ? ''त्या'' बॅनर्सवरचा मजकूर काय ?
img
दैनिक भ्रमर
सध्या राजकीय वर्तुळात एकाच चर्चेला उधाण आले आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार. यावर सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये लागलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत. ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या या फलकावरचा मजकूर लक्ष वेधून घेत आहे.राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण द्या, असं साकडं या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना घालण्यात आले आहे.शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी हे फलक लावले आहेत.

राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणे बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होतेउद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलतील. राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. परदेशातून परतल्यानंतर राज ठाकरे यांसदर्भात काही महत्त्वाची घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group