राज्यातील घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी आता पर्यंत अनेक महत्वाच्या विषयांमध्ये मोठं मोठे निर्णय घेतले असून आता पुन्हा एकदा ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसतेय. बीड जिल्यात अजित पवार यांनी विविध पक्षातील माजी आमदार, पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का दिला असल्याचे समजतेय.
बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार हे बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय बैठकांसोबत अजित पवारांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना संबोधित केले होते. या वेळी त्यांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता.
बीडमध्ये अजितदादांनी पालकमंत्री पदाची धुरा हातात घेताच जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नेत्यांनाही धक्के देण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षातील माजी आमदार, पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील 338 जणांचे शस्त्र परवाने अजित पवारांनी रद्द केले आहेत.
माजी आमदार व जिल्ह्यातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि राजकीय नेते यांचे देखील शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यात गुन्हा दाखल असल्याचे कारण देण्यात आले आहे. शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला चाप बसावा यासाठी ही मोठी कारवाई समजली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचेही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवाने चर्चेत आले होते. बीडमधील काही कुख्यातांचे बंदुकीसह रील्स व्हायरल झाले होते. त्याशिवाय, ज्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, अशांना देखील शस्त्र परवाने देण्यात आले होते. त्यावरूनही प्रशासनावर टीका झाली होती.
शस्त्र रद्द केलेल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची नावे नेत्यांचे नावे :
- दिवंगत माजी आमदार विनायकराव मेटे
- माजी आमदार सुनील धांडे (शिवसेना ठाकरे गट)
- आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के
- शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप
- धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड
- नारायण शिंदे (धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष)
- अशोक चांदमल लोढा (भाजप नेते, पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय)
- निळकंठ चाटे (भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष)
- गोविंद फड सभापती परळी (धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय)
- विक्रम बाप्पा मुंडे (भाजप नेते)
- दिलीप अण्णा गोरे राष्ट्रवादी नेते