निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली
निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली "ती" योजना सरकार गुंडाळणार , कुणाला बसणार फटका?
img
Dipali Ghadwaje
धाराशिव : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अनेक योजनांचा पाऊस पाडला. विधानसभा निवडणुकीआधी आणि लोकसभा निवडणुकीआधी जाहीर झालेल्या योजनांचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला होता. आता राज्य सरकारने गेमचेंजर ठरलेली योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महायुती सरकारला लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे निवडणुकीत भरभरून प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत देण्यात आला होता. आता, त्यातील एक योजना बंद होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरिपापासून गुंडाळली जाणार असल्याचे वृत्त 'एका वृत्त संस्थेने' दिले आहे. 

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा एका वृत्तपत्राने दिला आहे. येत्या खरिप हंगामापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश 26 मार्च रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागाने आयुक्तांना दिले आहेत.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group