मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 'इतक्या' रूपयांची वाढ
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 'इतक्या' रूपयांची वाढ
img
DB
 आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारने ३ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे.

पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतनात वाढ मिळणार आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले ३ महत्त्वाचे निर्णय कोणते?

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)

राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० ची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार ८,००० विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group