नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने उर्वरित जिल्हाध्यक्षांची निवड घोषित करण्यात आली आहे.
त्यात नाशिक शहराध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव, तर नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम यांची निवड झाली आहे.
भाजपने मे महिन्याच्या सुरुवातीस राज्याची कार्यकारिणी जाहीर केली होती; मात्र त्यात नाशिकचा समावेश नसल्यामुळे नवीन शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष कोण, याबाबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती.