वडिलांचा 'तो' सल्ला ऐकायला हवा होता...;  नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
वडिलांचा 'तो' सल्ला ऐकायला हवा होता...; नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आयोजित बोलक्या रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांच्या बाबत आपलं मत व्यक्त केलं. यावेळी या कार्यक्रमाला ज्या मुलांचे व्यंगचित्रांसाठी नंबर आले त्यांना बक्षीस देखील देण्यात आलं आहे.

आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता. तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं. त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला होता की काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा. पण मी तो ऐकला नाही, अशी खदखद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली. 

अमित ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, व्यंगचित्राची कला ही तुम्हाला कोणी शिकवत नसतं ही कला तुमच्या आत असते किंवा नसते. माझे अनेक मित्र आहे जे ड्रॉईंग शिकले व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न देखील केला पण त्यांना एक साधी रेषा देखील काढता येत नाही.

आज याठिकाणी लहान मुलांचं व्यंगचित्र पाहून खूपच आनंद झाला आहे. तुमची ही कला असून ती वाया घालवू नका. मला जो माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता तोच मी तुम्हाला देईल. की  आयुष्यात कितीही  व्यस्त झाला तरी एक तास हे व्यंगचित्राला देत जा, असा सल्ला यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित मुलांना दिला. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group