मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल , प्रकरण काय ?
मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल , प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर नवी मुंबईतील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला हा आतापर्यंतचा पहिलाच गुन्हा आहे.

नेमकं प्रकरण काय ? 
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरेंना ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं.

त्यानंतर नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होणार असल्याची कल्पना अमित ठाकरेंना होती. त्यावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं होतं की, या कार्यासाठी झालेला हा माझ्यावरील पहिला गुन्हा असेल आणि त्याचा मला आनंदच असेल'.

अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की, महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत... महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन केला जाणार नाही. आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो होतो. त्यावेळी समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नसल्याने घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवलाय. या चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा…सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचल्याचे दिसले'.

'स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून महाराजांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही?हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे' ,अशी टीका त्यांनी केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group