नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांची दिल्लीत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली.
तावडे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न दोन्ही बाजून केले जात आहेत. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरे चार दिवसांपूर्वीदेखील दिल्लीला गेले होते. या बैठकीत मनसेला लोकसभेच्या किती जागा सोडल्या जातील, मनसेचं सत्तेत काय स्थान राहील? याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मनसेने २ जागांची मागणी केल्याचे देखील समजते.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर लिहिले आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं".