विधानसभा निवडणुक : अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ; विधानसभेत करणार मदत?
विधानसभा निवडणुक : अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ; विधानसभेत करणार मदत?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यातली जवळीक आणखी वाढली आहे. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना जागा सोडायला तयार आहे. मनसे नेते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना त्यांच्यासाठी जागा सोडणार आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना भांडुप मतदारसंघ सोडायला शिवसेना तयार आहे.

मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली तर ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतलेला नाही.

भांडुप मतदारसंघामध्ये सध्या रमेश कोरगावकर हे आमदार आहेत. रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे, पण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जागा सोडायला तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नसला तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांना मदत करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group