मनसे-भाजप युती झाली तर कुणाला फायदा होणार?
मनसे-भाजप युती झाली तर कुणाला फायदा होणार?
img
दैनिक भ्रमर

लोकसभा निवडणुकीपूर्वी रो नाव नवीन घडामोडी घडत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यात लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. 

मनसे-भाजप युती झाली तर दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. मनसेची भाजपसोबत युती झाली तर राज्यात मनसेचा थेट सत्तेत सहभाग होणार आहे. यामुळे पक्षाला नव्याने उभारी येऊ शकते. यांची युती झाल्यास विधानसभेत मनसेची ज्या मतदारसंघांंमध्ये ताकद आहे त्या जागा महायुती सोडू शकते.


या युतीचा भाजपलादेखील तितकाच फायदा होऊ शकतो. राज ठाकरे हे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप मोठी गर्दी होते. राज ठाकरे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर सडकून टीका करतात. ते मुद्द्यावर आणि चपखल शब्दांत विरोधकांवर निशाणा साधतात.



तरुणांमध्ये त्यांची जास्त क्रेझ आहे. त्यामुळे त्यांचा भाजपला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group