काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट; जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता
काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट; जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनी मुंबईमध्ये आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी अतिशय गतिमान झाल्या आहेत. या हालचालींमध्ये नाशिक जिल्हाही मागे नसून नाशिक जिल्ह्यातही वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काल नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सुटावा यासाठी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर खा. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार कोण याबाबत रोज नवीन नाव समोर येत आहे.

हे सर्व घडत असताना आज पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नवीन घडामोडी झाली असून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर यांनी आज सकाळी मुंबईमध्ये सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितले आहे.



यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडे अजित पवार यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले होते परंतु त्यांनी न दिल्याने नाराज असल्याची भावना बोलून दाखवली आहे.

हिरामण खोसकर हे जरी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच शरद पवार यांचे ते एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आता त्यांच्या भेटीने जिल्ह्यातील राजकारणामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झालेले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group