ठाकरे आणि शिंदे गटासाठी मोठी बातमी ! पक्षाचं नाव अन चिन्ह कोणाला ? आली ''ही''  मोठी अपडेट
ठाकरे आणि शिंदे गटासाठी मोठी बातमी ! पक्षाचं नाव अन चिन्ह कोणाला ? आली ''ही'' मोठी अपडेट
img
दैनिक भ्रमर
राजकारणातील घडामोडीं  आला असून आता शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील फूटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आता तब्बल दीड वर्षांनी, या प्रकरणावर 7 मे रोजी (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे 'शिवसेना' हा मूळ पक्ष कोणाचा आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाकडे राहणार, याच्या सुनावणीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.सुप्रीम कोर्टात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाच्या निकालात अनेक महत्त्वाच्या मुद्याचा समावेश होता.

त्यानंतर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील याआधी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यांच्या निकालानुसार, शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले नाहीत आणि विधीमंडळातील शिवसेना पक्ष शिंदे गटाकडेच गेला. विशेष म्हणजे ठाकरे गटातील आमदार देखील अपात्र करण्यात आले नाहीत. तर, दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे शिंदे गटाकडे सुपूर्द केले.यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये महायुती पुन्हा सत्तेत आली आणि शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर, बुधवारी होणारी सुनावणी हा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची असणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group