राजकीय : नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का ; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
राजकीय : नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का ; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
img
Dipali Ghadwaje
राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मालेगावचे प्रसाद बळीराम हिरे यांचा आज (मंगळवारी) भाजपात प्रवेश होणार आहे.

प्रसाद हिरे हे भाऊसाहेब हिरेंचे नातू आहेत. राज्याचे आरोग्य, पाटबंधारे, ऊर्जा, शिक्षण अशा विविध खात्यांची कॅबिनेट मंत्रिपदे भूषवलेले दिवंगत डॉ. बळीरामजी हिरे  यांचे ते चिरंजीव आहेत. 

मुंबईतील भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रसाद हिरे भाजप प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी मालेगावातून 300 पेक्षा अधिक वाहनांनी कार्यकर्ते सकाळी मुंबईला रवाना होणार आहेत.  

प्रसाद हिरे हे कै. भाऊसाहेब  हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी भाजपकडून विधानसभा, विधानपरिषद निवडणूक लढले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group