राजकारणातील घडामोडींना वेग आला असून राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी शेतकरी आणि कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता . त्यांनतर त्यांनी दलगिरी देखील व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना तंबी दिल्याचंही म्हटलं जातंय.
दरम्यान, आता कोकाटे यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानांबाबत भाष्य केलंय. माजा असा स्वभाव जन्मजात आहे. माझा हेतू स्वच्छ आहे, असे कोकाटे म्हणाले आहेत. ते पुण्यात पत्रकार पत्रकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“माझा स्वभाव जन्मजात आहे, तो एका दिवसात बदलणार नाही. पण माझा हेतू स्वच्छ आहे. कोणत्याही विधानाच्या आडून काही साध्य करायचा माझा उद्देश नाही,” असे कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच “मी परखड सत्य बोलतो. माझा स्वभाव कडक असला तरी माझा हेतू शेतकऱ्यांचे भले करण्याचा आहे. नवी पिढी शेती व्यवसायात यावी, कमी खर्चात जास्त उत्पादन काढावे, यासाठी मी काम करत आहे,” असेही कोकाटे यांनी सांगितले.