धक्कादायक ! आठवीच्या   विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले कंडोम, चाकू अन् ड्रग्ज !
धक्कादायक ! आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले कंडोम, चाकू अन् ड्रग्ज !
img
दैनिक भ्रमर
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडले आहेत. शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून फायटर, सायकलची लोखंडी चेन, धारदार चाकू, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटे आणि पत्यांचे कॅट. विशेषत: अंमली पदार्थही सापडले आहेत. 

दरम्यान, हे आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्काच बसला. शिक्षकांनी सांगितलं की, हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. काही जण शाळेतच अंमली पदार्थांचे सेवन करत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेक असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये बदल, वाईट संगत आणि सोशल मीडियामुळे होणारे प्रभाव यावर आता गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी शिक्षक आणि पालक वर्गाकडून केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group