वादळी वाऱ्यासह राज्याला पाऊस झोडपणार, ''या'' जिल्ह्यांना हवामान विभागाचा हाय अलर्ट
वादळी वाऱ्यासह राज्याला पाऊस झोडपणार, ''या'' जिल्ह्यांना हवामान विभागाचा हाय अलर्ट
img
दैनिक भ्रमर
राज्यातील वातावरणात कमालीचे बदल होत असून गेल्या चार -पाच दिवसांपासून महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागा भुईसपाट झाल्या आहेत.  ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आजा पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.  अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी फलक कोसळण्याच्या घटना घडल्या. याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला. वादळामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

कल्याणमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे  खरेदीसाठी बाहेर निघालेल्या तसेच घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान दुसरीकडे या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अंबरनाथला देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. शहरात सर्वत्र सोसाट्याचा वारा अन धुळीचं वादळ आलं आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, जोरदार पावसाची शक्यता आहे, आज कोकणासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group