नाशिक ते अयोध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. नाशिकरांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. विमानाने थेट श्रीनगर आणि अयोध्येला देखील जाता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन 31 मार्चपासून देशातील 35 प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह 35 प्रमुख शहरांसाठी ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरुन अवघ्या काही तासातच तुम्ही कोईमतुरपर्यंत जाऊ शकणार आहे. यामुळे उटीला जाण्यासाठी सुलभता होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. 35 प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. देशातल्या सर्वच भागातील विमानसेवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याचा फायदा नाशिकच्या पर्यटनासह उद्योगांना देखील होणार आहे.