भुसावळ येथील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अर्जुन लक्ष्मण बावस्कर असे शहीद जवानाचे नाव असून ते वरणगाव येथे राहणारे होते. अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर ते कार्यरत होते. भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते.
दरम्यान , उद्या, बुधवारी मेंढवण येथे सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अर्जुनचे पार्थिव सेना दलाच्या विशेष विमानाने संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे बुधवारी रात्री पर्यंत पोहचणार असून गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अरुणाचल प्रदेश याठिकाणी 24 मार्च रोजी रात्री ची गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्या ठिकाणी ते सेवा बजावत होते त्या ठिकाणी प्राणवायू कमी असतो. प्रथम त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला त्यानंतर काही वेळात हार्ट अटॅक आला आणि ते कोसळले.
लगेच जवानांनी त्यास दवाखान्यात दाखल केले होते. काल उशिरापर्यंत जळगाव जिल्हाधिकारी यांना हा संदेश देण्यात आला. त्यानंतर वरणगांव पोलीस स्टेशनला जळगावहून संदेश आल्यावर सहाय्यक पोलिस निरिक्षक जनार्दन खंडेराव यांनी ही दु:खद बातमी शहीद अर्जुनच्या परिवाराला दिली होती . याबाबतची माहिती कुटुंबीयांना कळताच अश्रू अनावर झाले. तसेच गावातील वातावरणही सुन्न झाले.