‘मेरा येशु येशु’ फेम बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा, काय आहे प्रकरण ?
‘मेरा येशु येशु’ फेम बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा, काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर
एक मोठी बातमी समोर येत आहे. २०१८ च्या बलात्कार प्रकरणात पंजाबमधील मोहाली येथील न्यायालयाने स्वयंघोषित धर्मोपदेशक पास्टर बजिंदर सिंग यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. "येशू येशु पैगंबर" म्हणून लोकप्रिय झालेले ४२ वर्षीय सिंग यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल शिक्षा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवण्यात आल्यानंतर पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले होते.

२०१८ मध्ये झिरकपूर पोलिस ठाण्यात एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की बजिंदर सिंगने तिला परदेशात नेण्याचे आश्वासन देऊन फूस लावून मोहालीतील सेक्टर ६३ येथील त्याच्या निवासस्थानी तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओही बनवला. आरोपीने धमकी दिली होती की जर तिने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेल.

२८ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या दुसऱ्या प्रकरणात पाद्री चौकशीला सामोरे जात असताना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. २२ वर्षीय महिलेने त्याच्यावर लावलेल्या छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कपूरथळा पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे. सिंह यांनी त्याच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले होते.

पीडितेने दावा केला की बजिंदर सिंग धर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होता. धर्मांतरासाठी बजिंदर सिंगला बाहेरून हवाला मार्गे पैसेही मिळाले आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार ती गेल्या ७ वर्षांपासून न्यायासाठी न्यायालय आणि पोलिस ठाण्यात चकरा मारत आहे. पीडितेने दावा केला की तिच्यासारख्या इतर अनेक महिलांचे पाद्री बजिंदर सिंगने शोषण केले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group