दुचाकी स्लीप झाल्याने महिला थेट एसटीच्या चाकाखाली, चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत आईचा अंत
दुचाकी स्लीप झाल्याने महिला थेट एसटीच्या चाकाखाली, चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत आईचा अंत
img
दैनिक भ्रमर

एका भीषण अपघाताची हृदयय द्रावक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या आईचा करून अंत झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या वाहनी गावाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेचा तिच्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जात असताना गाडी घसरल्याने महिला थेट एसटीच्या चाकाखाली आली. यात महिलेचा चिरडून मृत्यू झाला आहे. दोन चिमुकले आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत हा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीना ओमेश्वर कडू असं मृत पावलेल्या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्या आपल्या पती आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होत्या. हे चारही जण सरांडीवरून चिखला इथं आपल्या गावी जात होते. दरम्यान, सिहोरा येथील वाहणी गावाजवळून जात असताना दुचाकी स्लीप झाली. इथं एका पाण्याच्या टाकीजवळ शेण पडलं होतं. या शेणावरून चाक गेल्यानंतर दुचाकी घसरली.

यावेळी मयत मीना या डांबरी रस्त्यावर खाली पडल्या. याचवेळी सिहोराकडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली मीना सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून बसचं चाक गेलं. दुचाकी घसरल्यानंतर मीना यांचे पती आणि दोन मुलं रस्त्याच्या डाव्या बाजुला पडल्याने तिघं बचावले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group