मारामाऱ्या  करणारे ''ते '' दोन जण वेगळे ? मग महादेव गितेला कारागृहातून का हलवलं ? नेमकं काय घडतंय ?
मारामाऱ्या करणारे ''ते '' दोन जण वेगळे ? मग महादेव गितेला कारागृहातून का हलवलं ? नेमकं काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणा अक्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड कारागृहात मारहाण झाल्याचे समोर आले. दरम्यान, या माहितीने एकच खळबळ निर्माण झाली.आता या प्रकरणाला आणखी एक वळण लागले आहे.  मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनानं वेगळी माहिती दिली आहे. 
 
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड कारागृहात मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. एकीकडे महादव गित्तेला कारागृहातून हलवण्यात आलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनानं वेगळी माहिती दिलीय. बंदी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेत मारहाण झाल्याची माहिती देण्यात आलीय . जर मारहाण वाघमोडे आणि सोनवणेमध्ये झाली तर मग महादेव गितेला जेलमधून का हलवलं अशी चर्चा सुरू झाली आहे. तर वाल्मिकच्या सांगण्यावरून आपल्यालाच मारहाण झाल्याचा गित्तेचा आरोप आहे. त्यामुळे आता बीडच्या जेलमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत आहे.

बीडच्या कारागृह मारहाण प्रकरणाला वेगळे वळण मिळाली आहे. बंदी सुदीप सोनवणे व बंदी राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता . सोनवणे आणि वाघमोडे हे सकाळी 9.15 ते 9.30 दरम्यान सर्कल समोर आले होते, यावेळी नातेवाईकांना दूरध्वनी करण्याचे काम सुरू होते. त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना वेगवेगळे केले यानंतर दोघांना त्यांच्या बराक मध्ये बंद करण्यात आले , अशी माहिती कारागृहाचे अधीक्षक भास्कर मुलानी यांनी दिली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली जाणार आहे.

सोनवणे आणि राजेश वाघमोडेत मारहाण झाल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे, मग महादेव गित्तेला का हलवलं? असा सवाल गित्ते कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. एवढचं नाही तर गित्तेनी स्वत: कराडकडून मारहाण झाल्याचे म्हटले मग कराडला का हलवलं नाही, असा देखील सवाल उपस्थित होत आहे. कराडला बीड कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हसवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे, मग कराडला बीडमधून का हलवतं नाही? गित्तेच्या आरोपात जर सत्यता असेल तर कारागृह प्रशासन वाल्मिकला सेफ करतय का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group