राज्यातील घडामोडींना वेग आला असून आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडत आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून जोरदार हल्लाबोल केला आहे,
‘काही जण म्हणतात हरलेला पक्ष. झालं निवडणुका संपल्या. सर्व गोष्टी झाल्या. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून मनसेला मत दिली, ज्यांची मतं दिसली त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करूनही ईव्हीएम मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाही, त्यांचेही आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या. काय काय गोष्टी झाल्या. यावर मी बोललो. जे झालं ते झालं. आता पुढे बघायचं, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मला बरंच बोलायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच मला फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खोचक टोला यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.