८ व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार १४००० ते १९००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
आठव्या वेतन आयोगाबाबत Goldman Sachs चा रिपोर्ट समोर आला आहे.यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या सिमितीची स्थापना एप्रिल २०२५ मध्ये होईल. यानंतर २०२६ किंवा २०२७ मध्ये शिफारशी लागू होणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सरासरी १ लाख रुपये आहे. त्यांच्या पगारात सरासरी १४-१९ टक्क्यांनी वाढ होणार आहे. जर तुमचा पगार १.७५ लाख रुपये असेल तर तुमच्या पगारात १४,६०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर सरकारने आठव्या वेतन आयोगावर २ लाख कोटी रुपये खर्च केले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात १६,७०० रुपयांनी वाढ होईल. जर सरकारने २.२५ लाख कोटी रुपये खर्च केले तर पगारात १८,८०० रुपयांनी वाढ होईल.
दरम्यान , आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाखपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. ६५ लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना पेन्शन मिळणार आहे. मागच्या वेळी १.०२ लाख कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर यावेळी जास्त खर्च करण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर २.५७ होता. यामुळे बेसिक सॅलरी ७००० रुपयांवरुन १८०० रुपये झाली होती. जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर तसाच ठेवला तर वेतन ४६,२६० रुपये होणार आहे. काही रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर १.९२ होऊ शकते. यामुळे बेसिक सॅलरी ३४,५६० रुपयांपर्यंत वाढू शकते.