प्रशांत कोरटकरला शिवरायांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे चांगलेच भोवले आहे. दरम्यान आता प्रशांत कोरटकरचा जेल मधील मुक्काम वाढला असून कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने आज कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र यानंतर लगेचच जामीन साठी अर्ज केला मात्र यावर 1 एप्रिलला सुनावणी ठेवल्याने त्याचा मुक्काम वाढला आहे.
प्रशांत कोरटरचा मुक्काम आता पोलीस कोठडीतुन जेल मध्ये हलवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरटकरने यानंतर लगेचच जामीन साठी अर्ज केला मात्र यावर 1 एप्रिलला सुनावणी ठेवल्याने त्याचा मुक्काम वाढला आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरने पाच दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
त्याचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकरला एकदा तीन दिवस आणि नंतर दोन अशी पाच दिवस दिलेली कोठडी पुरेशी असल्याचे न्यायालयासमोर मांडले. गेल्या दोन वेळचा अनुभव पाहता आज त्याला सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाइन व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले होते.