सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं  ''हे'' नवीन स्पष्टीकरण, नक्की काय म्हणाले ?
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं ''हे'' नवीन स्पष्टीकरण, नक्की काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मारहाणीत मृत्यू झाला होता. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये  'सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू हा श्वसनाचा त्रास असल्यामुळे झाला होता. त्याला पोलीस कोठडीत मारहाण झाली नव्हती, अशी माहिती दिली होती. दरम्यान या प्रकरणात आता नवीन अपडेट आली आहे. 

 परभणी हिंसाचार प्रकरणामघ्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आता नव्याने उत्तर दिलं आहे. ' पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वेगळी माहिती होती. पण या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल, तर समितीने अहवाल दिला तर पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केली जाईल, अशी ग्वाही दिली.

तसेच, 'सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संदर्भात पोस्टमार्टमचा रिपोर्ट वेगळा आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट जेव्हा करतो तेव्हा व्हिसेरा बाजूला ठेवलेला असतो.  हा रिपोर्ट वेगळा असतो. आता व्हिसेराच्या अंतिम अहवाल हातात आला आहे. व्हिसेरा रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वेगवेगवेळी माहिती समोर आली आहे' असा खुलासा फडणवीसांनी केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group