बीड कारागृह मारहाण प्रकरण :  तुरुंग प्रशासनाने घेतला ''हा''  मोठा निर्णय
बीड कारागृह मारहाण प्रकरण : तुरुंग प्रशासनाने घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर

राज्यातील  घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी  बातमी समोर येत आहे. सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली. बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे सांगितले जात होते. परंतु तुरुंग प्रशासनाने कराड अन् घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. मात्र सोनवणे आणि गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता महादेव गित्तेसह चार आरोपींनी बीड कारागृहातून हलवण्यात आले आहे.

महादेव गित्तेसह चार आरोपींना बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी ९.३० वाजता मारहाणीचा झालेल्या प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला. मकोकातील आरोपी आणि इतर आरोपी नाश्त्याच्या वेळी एकत्र आले. दोन गट आमनेसामने आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. सोनवणे गट आणि महादेव गित्ते यांच्या गटात ही मारहाण झाली. परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली नाही, असे तुरुंग प्रशासनाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कारागृहातून महादेव गित्ते याला छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलीस बंदोबस्तात असलेल्या महादेव गित्ते याने माध्यमांशी संवाद साधला. जोरजोरात बोलत तो म्हणाला, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी आम्हाला धमकवले. या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी मागणी त्याने केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group