नागरिकांना मोठा दिलासा देणारी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. नागरिकांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी, विशेष सुट्टीच्या काळातही दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात 10 % वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिक आपले स्थावर मालमत्तांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी झपाटले आहेत. त्यामुळे राज्यभरातील दस्तनोंदणी कार्यालयांत सध्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
परंतु, मार्च महिन्याच्या अखेरीस सलग तीन दिवस सुट्टी असल्याने दस्तनोंदणी प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, यासाठी 29, 30 आणि 31 मार्च रोजीही दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी यासंबंधी अधिकृत आदेश जारी केला आहे.
दस्तनोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हा राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो. मागील आर्थिक वर्षात 55,000 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षासाठी हे उत्पन्न 60,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.दरम्यान, राज्य सरकारला महसूल वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी, विशेष सुट्टीच्या काळातही दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
> > कोणत्या तारखांना दस्तनोंदणी कार्यालये सुरू असतील?
- 31 मार्च 2025 (सोमवार,सार्वजनिक सुट्टी )