स्वस्त आणि आरामदायी प्रवासा करिता प्रवासी नेहमीच रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतो. त्यामुळे नेहमीच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येते.त्यातच आता उन्हाळी सुट्टी लागणार असून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ होणार आहे.याच अनुषंगाने उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी भारतीय रेल्वेने खास तयारी केली आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी भारतीय रेल्वेने खास तयारी केली आहे. महाकुंभ मेळा आणि होळी यानंतर येणाऱ्या उन्हाळी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने ३३२ विशेष प्रवासी रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे अर्थातच मध्य रेल्वे विभागाने या गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि थांब्यांची माहिती जाहीर केली आहे. या विशेष गाड्या मुंबई विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवरून धावणार आहेत.मुंबई – नागपूर,मुंबई – करमळी,मुंबई – तिरुअनंतपुरम,पुणे – नागपूर आणि
दौंड – कालाबुर्गी या मध्य रेल्वेच्या मार्गांवर उन्हाळ्यात उन्हाळी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्विसाप्ताहिक विशेष ( ५० फेऱ्या)
गाडी क्र. ०२१३९ हि गाडी ६ एप्रिल ते २९ जून दरम्यान प्रत्येक मंगळवार आणि रविवार धावणार असुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री ०० : २० सुटेल आणि नागपूर स्थानकात दुपारी १५ : ३० मिनिटाला पोहचेल.तर गाडी क्र. ०२१४० हि ६ एप्रिल ते २९ जून दरम्यान प्रत्येक मंगळवार आणि रविवार धावणारा असून नागपूर स्थानकातून रात्री २० : ०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी १३ : ३० वाजता पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जलगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकात थांबा राहणार आहे.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- करमळी साप्ताहिक विशेष ( १८ फेऱ्या)
गाडी क्र. ०११५१ हि १० एप्रिल ते ५ जून 2025 दरम्यान प्रत्येक गुरुवारी धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून रात्री ०० : २० मिनिटानी सुटेल आणि करमळी स्थानकात दुपारी १३ : ३० मिनिटानी पोहचेल. तर गाडी क्र. ०११५२ हि १० एप्रिल ते ०५ जून दरम्यान प्रत्येक गुरुवारी धावणार असून करमळी स्थानकातून दुपारी १४ : १५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ३ : ४५ ला पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड़, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवीम या स्थानकात थांबा राहणार आहे.
३. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – करमळी साप्ताहिक विशेष ( १८ फेऱ्या)
गाडी क्र. ०११२९ हि १० एप्रिल ते ०५ जून दरम्यान प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री २२ : १५ मिनिटांनी सुटेल आणि करमळी स्थानकात १२ : ०० पोहचेल. तर गाडी क्र. ०११३० हि ११ एप्रिल ते ६ जून दरम्यान प्रत्येक शुक्रवार करमळी स्थानकातून दुपारी १४ : ३० सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे ४ : ०५ मिनिटांनी पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवीम या स्थानकात थांबा राहणार आहे.
४. लोकमान्य टिळक टर्मिनस LTT-तिरुअनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष ( १८ फेऱ्या)
गाडी क्र. ०१०६३ हि ०३ एप्रिल ते २९ मे दरम्यान प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी १६ : ०० वाजता सुटेल आणि तिरुअनंतपुरमला रात्री २२ : ४५ ला पोहचेल. तर गाडी क्र. ०१०६४ हि ०५ एप्रिल ते ३१ मे दरम्यान प्रत्येक शनिवारी तिरुअनंतपुरम दुपारी १६ : २० ला सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री ०० : ४५ ला पोहचल. या गाडीला पनवेल, रत्नागिरी, करमळी, मडगाव, कुमटा, भटकल, उडुपी, मंगलोर, कन्नूर, कोझिकोड, त्रिशूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला आणि कोल्लम स्थानकात थांबे राहणार आहे.
५. पुणे – नागपूर सुपरफास्ट विशेष ( २४ फेऱ्या)
गाडी क्र. ०१४६९ हि ०८ एप्रिल ते २४ जून दरम्यान प्रत्येक मंगळवारी पुणे स्थानकातून दुपारी १५ : ५० ला सुटेल आणि नागपूर स्थानकात सकाळी ०६ : ३० मिनिटांनी पोहोचेल. तर गाडी क्र. ०१४७० हि ०९ एप्रिल ते २५ जून दरम्यान प्रत्येक बुधवारी दादर असून नागपूर स्थानकातून सकाळी ०८ : ०० वाजता सुटेल आणि पुणे स्थानकात रात्री २३ : ३० मिनिटांनी पोहचेल. या गाडीला उरुळी, दौंड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, धामणगाव आणि वर्धा थांबा राहणार आहे.
६. दौंड - कालाबुर्गी अनारक्षित विशेष ( १२८ फेऱ्या )
गाडी क्र. ०१४२१ हि ०५ एप्रिल ते 02 जुलै दरम्यान आठवड्यात ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता ) डाउनलोड आहे दोन स्थानकातून पहाटे ५ : ०० वाजता गाडी सुटेल आणि कालाबुर्गी स्थानकात ११ : २० मिनिटाला पोहचेल. तर गाडी क्र. ०१४२२ हि ०५ एप्रिल ते ०२ जुलै दरम्यान आठवड्यात ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) धावणार असून कालाबुर्गी स्थानकातून दुपारी १६ : १० मिनिटांनी सुटेल आणि दौंड स्थानकात रात्री २२ : २० मिनिटांनी पोहचेल. या गाडीला भिगवन, जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर, अकुलकोट आणि गणगापूर या स्थानकात थांबे राहणार आहे.