वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा मिळाला आहे. कुणाल कामराला ७ एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मद्रास हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.
कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित केले. कुणाल कामराने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सर्वजण करत आहेत. या प्रकरणी कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.
कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. कुणाल कामराला ७ एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मद्रास हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.
कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, “जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” तो असे विनोदी शैलीत बोलला. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिलंय.
या गाण्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडीओची तोडफोड केली. कुणाल एक गाणे बनवून थांबला नाही. त्याने आणखी एक गाणे प्रदर्शित केले. ‘हम होंगे कंगाल’ असे त्या गाण्याचे बोल होते. या गाण्यानंतर सर्वच स्तरांमधून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.